Ladki Bahin Yojana Last Date Extended: लाडकी बहीण योजनेची अर्जाची अंतिम तारीख वाढली! महिलांना मिळाली सुवर्णसंधी!

Ladki Bahin Yojana Last Date Extended: लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे! आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या महिलांनी अजून अर्ज भरले नाहीत, त्यांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना आणखी काही दिवसांचा अवधी दिला आहे. या संधीचा लाभ घ्या आणि त्वरित लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरा.

या लेखात मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी किती दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे, याबद्दल माहिती देणार आहे. तसेच नवीन अर्ज कुठून करायचे, याचीही सविस्तर माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून योजनेचा लाभ मिळवता येईल.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांना आणखी एक संधी दिली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती, पण आता ती आणखी वाढवून 15 ऑक्टोबर 2024 करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला स्वतः ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फतच भरावा लागणार आहे.

अंगणवाडी सेविकांना शासनाने एक विशेष आयडी प्रदान केला आहे. त्या आयडीच्या माध्यमातून सेविका 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरू शकतात.

Ladki Bahin Yojana Last Date Extended

 लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. याआधी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ होती, पण आता आणखी 15 दिवसांची वाढ मिळाली आहे. ज्यांनी अद्याप फॉर्म भरला नाही, ते या तारखेपर्यंत अर्ज करू शकतील.

Ladki Bahin Yojana Last Date Update

शासनाने अर्ज मुदतवाढ दिल्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. या योजनेचा लाभ सर्व महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने ही महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल, तर वेळ न घालवता अर्ज भरा.

Ladki Bahin Yojana Online Apply Link

या मुदतवाढीत एकच अट आहे की अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरायचा आहे. अर्ज भरताना सेविकांच्या आयडीचा वापर होईल, अन्य कोणत्याही माध्यमातून अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांना भेटून फॉर्म भरून घ्या.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज तोच पोर्टल वापरून भरायचे आहेत, पण सेविकांचा आयडी आवश्यक आहे. यासाठी ऑफिस नेम नंबर प्रोफाइलमध्ये असणे महत्त्वाचे आहे.

ही महत्त्वाची माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास मदत करा.

अधिक वाचा: Ladki Bahin Yojana Form Reject Re-Apply | लाडकी बहिन योजना फॉर्म रिजेक्ट झाला? त्वरित पुनः अर्ज करा आणि ऑनलाइन फॉर्म एडिट करण्याची पद्धत जाणून घ्या

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!