माजी विद्यार्थ्यांनी दिली एल.पी.इंग्लिश स्कुलला वॉटर प्युरिफायरची भेट

खेड प्रतिनिधी- (मंदार आपटे) :
सन १९९८ मधील SSC बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी एल.पी.इंग्लिश स्कुलला वॉटर प्युरिफायरची भेट दिली मे महिन्यामध्ये या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत स्नेह मेळावा आयोजित केला होता त्यावेळी या सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रशालेला चांगली वस्तू भेट देण्याचे आश्वासन दिले होते.

त्या नंतर या मुलांनी शाळेला वॉटर प्युरिफायर भेट म्हणून दिला आत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे या हेतुने आम्ही हि भेट देत आहोत असे या विद्यार्थ्यांनी सांगितले सदर भेट देताना माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी श्री. निलेश देवरुखकर, प्रेषित शेट, समीर जाडकर, मंदार आपटे जगदीश पार्टे व अमोल मोरे यांनी शाळेतील शिक्षक श्री.भगत सर व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांच्याकडे सुपूर्त केली.

यावेळी शाळेच्या वतीने भगत सर यांनी या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!