Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी महिलांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात कुणाचंही सरकार आले तरी महिला योजनांसाठी सोन्याचे दिवस येणार आहेत.
भाजपने त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी दरमहा 2100 रुपये देण्याचे वचन दिले आहे. तर काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास महिलांना 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवून आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याचेही आश्वासन दिले आहे.
त्याचबरोबर, काँग्रेस महाविकास आघाडीने महिलांना वर्षाला सहा सिलिंडर केवळ 500 रुपयात देण्याचं आणि बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास देण्याचं वचन दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा आघाड्यांच्या घोषणा पत्रात महत्वाचा ठरला आहे.
महाराष्ट्रात महिलांना आकर्षित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकांमध्ये महिलांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने दोन्ही आघाड्या त्यांच्यासाठी विशेष योजना आणत आहेत.
Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana Latest News
भाजपने दिलेली आश्वासने:
- लाडकी बहिन योजना: भाजपने दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
- शेतकऱ्यांसाठी मदत: शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आणि PM Kisan योजनेतून अधिक आर्थिक मदत देणार.
- अंगणवाडी व आशा सेविकांचे मानधन: वाढवणार.
- लखपती दीदी योजना: 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती बनवणार.
- रोजगार निर्मिती: 25 लाख नवीन रोजगार देणार.
- विद्यार्थ्यांना मदत: 10 लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत.
- अर्थव्यवस्था: महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट.
- अक्षय योजना: गरिबांना मोफत जेवण देणार.
- कर्ज योजना: OBC, SC, ST वर्गासाठी 15 लाखांपर्यंत कमी दरात कर्ज.
- कर्मयोगिनी मेळा: प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी कर्मयोगिनी मेळा आयोजित करणार.
- महिला बचत गटांना मदत: 10 लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज.
महाविकास आघाडीने दिलेली आश्वासने:
- महालक्ष्मी योजना: दरमहा महिलांना 3000 रुपये देणार.
- बस प्रवास मोफत: महिलांसाठी संपूर्ण मोफत बस प्रवास.
- गॅस सिलिंडर: वर्षाला 6 सिलिंडर 500 रुपयांत उपलब्ध.
- महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा: लागू करणार.
- महिला कर्मचाऱ्यांना रजा: मासिक पाळीच्या दिवसांत 2 दिवसांची ऐच्छिक रजा.
- मुलींसाठी निधी: जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर बँकेत रक्कम ठेवणार, 18 वर्षांची झाल्यावर 1 लाख रुपये मिळतील.
- बेरोजगार भत्ता: सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4 हजार रुपयांपर्यंत भत्ता.
- शेतकरी कर्जमाफी: शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी.
- शेतकऱ्यांना प्रोत्साहन: नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपयांची सूट.
- सरकारी भरती प्रक्रिया: अडीच लाख जागांची भरती सुरु करणार.
- एमपीएससी निकाल: 45 दिवसांत निकाल जाहीर करणार.
- जातीनिहाय जनगणना: राज्यात जातीनिहाय जनगणना करून आरक्षण वाढवण्याचा विचार.
- संजय गांधी निराधार योजना: लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी 2 हजार रुपये.
- वीजबिल माफी: 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीजबील माफ.
- जुनी पेन्शन योजना: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करणार.
- स्थानिक निवडणुका: वेळापत्रक जाहीर करणार.
- अध्यादेश फेरविचार: महायुतीने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार.
- मानाचा सन्मान: महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी.
- शिवभोजन थाळी योजना: केंद्रे वाढवणार.
- मोफत औषध सेवा: सरकारी रुग्णालयात मोफत औषध.
- उद्योगासाठी मंत्रालय: सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय.
महिलांसाठी आणलेल्या या योजनांमुळे महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा युग सुरू होईल.