आता संपूर्ण महाराष्ट्रात एसटी पार्सल ची कुरियर सेवा पुन्हा सुरुवात

खेड रत्नागिरी (मंदार आपटे): गेली दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पार्सल सेवा आता सुरुवात झाली आहे तरी सर्व व्यापारी वर्गाने या कुरिअर सेवेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे आव्हान गुणाजी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

खाजगी कुरिअर पेक्षा अत्यंत जलद सर्विस व कमी पैशांमध्ये आपली वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खात्रीशीर अशी ही कुरिअर सर्व्हिस असल्याचेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे सध्या गुनिणा कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे काम मिळाले आहे.

तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा या कंपनीचे महाराष्ट्र बाहेर कंपनी सेवा देत असल्याचेही कंपनी व्यवस्थापनाने सांगितलेले आहे तरी सर्व विश्वासू प्रतिनिधींनी आपले व्यवसाय आपापल्या तालुक्यामध्ये चालू केले असल्याने त्याचा लाभ व्यापारी वर्गाने घेऊन महामंडळात सहकार्य करावे असे आव्हान एसटी प्रशासनामार्फत ही सांगण्यात आले आहे.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!
CLOSE AD