खेड (मंदार आपटे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े खेड येथे नुकताच मोगा (पोपटी) महोत्सव पार पडला. शहरातील तरूण, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांनी या महोत्सवाचा आनंद लुटला. मनसेचे वैभव खेडेकर, हेमा खेडेकर यांनी विशेष परिश्रम घेत या मोगा पार्टीचे नियोजन केले होते.
थंडीच्या कालावधीत राज्यात सर्वत्र हुरडा पार्टी, पोपटीचे आयोजन केले जाते. कोकणात मोगा पार्टी आयोजित केली जाते. मडक्यामध्ये पावट्याच्या शेंगा, वांगी, बटाटे, अंडी, मसाला मुरविलेले चिकन, मक्याची कणसे भरून मडक्याचे तोंड भांबुर्डीच्या पाल्याने बंद केले जाते. ही मडकी पालथी ठेवून त्या भोवती शेकोटी केली जाते. शेकोटीच्या आचेवर मडक्यातील पदार्थ शिजतात. त्याचा एकत्र बसून आस्वाद घेतला जातो.
हे देखील पहा :