खेड (मंदार आपटे) – शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी रोटरी इंग्लिश स्कूल खेड येथे १५ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झालेल्या आंतरशालेय नाटक स्पर्धेत भाग घेताना ‘निष्पाप’ नाटक उत्तमपणे सादर करताना द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट लेखक विजय मोहिते सरांना, उत्कृष्ट कलाकार कुमारी.फिरदौस पेडेकर हिला तर उत्कृष्ट नेपथ्य पुरस्कारासाठी नाझीमा महाते, रुबीना कडवईकर आणि जेबा खतीब मॅडम यांची निवड करण्यात आली.
सर्व यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सर, सर्व संस्थासदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.
हे देखील पहा :