Honda Hornet च्या यशानंतर Hornet 2.0 मॉडेल बाजारात, लूक एकदम खतरनाक

पहिल्या होर्नेटच्या यशानंतर होंडा टू व्हीलर इंडियाने होर्नेटचे नवीन मॉडेल बाजार मध्ये आहे. ते म्हणजे होंडा होर्नेट 2.0 तब्बल 180 सीसी च्या इंजिन सोबत मार्केटमध्ये नव्या दमाने या बाईकने एंट्री केली आहे. जबरदस्त आणि प्रीमियम फीचर्स सोबत ही बाईक ग्राहकांसाठी एक अप्रतिम संधी म्हणून समोर येत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ऑथराईज डीलरशिप ऑफिसमध्ये तुम्ही होर्नेट 2.0 बाईकची बुकिंग करू शकता या बाईकची एक्स शोरूम किंमत 1,26,345 रुपये एवढी आहे, आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात बाईकची डिलिव्हरी सुरू झालेली आहे.

फीचर्स: नवीन Honda Hornet 2.0 बाईक CBF190R वर बेस्ड आहे. ही बाईक प्रीमियम गोल्ड-फिनिश्ड USD फ्रंट फोर्क्स आणि रियर मध्ये मोनोशॉक सोबत येते. ब्रेकिंगसाठी दोन्ही व्हील्सवर पेटल डिस्क ब्रेक्स दिले आहेत. या बाईकमध्ये सिंगल चॅनल ABS सिस्टम स्टैंडर्ड फीचर रुपात येतात. नवीन होंडा हॉर्नेट 2.0 बाइक सिंगल-क्रैडल फ्रेम वर बेस्ड आहे. होंडाची ही बाईक शॉर्प LED हेडलँप, LED टेल लँप्स, LCD इंस्ट्रूमेंट कंसोल, मस्कलर फ्यूल टँक, स्टायलिश एलॉय, इंजिन स्टॉप स्विच सोबत येते.

शून्य ते १०० किलोमीटरचा वेग फक्त 11.25 सेकंदात

Honda Hornet 2.0 या मोटारसायकल मध्ये नवीन 184cc HET Bs6 PGM-FI इंजिन बसवण्यात आले आहे. कंपनी ने दावा केला आहे की ही मोटारसायकल फक्त 11.25 सेकंदामध्ये तब्बल 1000 किलोमीटर चा वेग पकडू शकते आणि याच कारण म्हणजे इंजिन, कारण हे इंजिन 8500 rpm वर तब्बल 17bhp पॉवर जनरेट जनरेट करते तर 6000 rpm वर 16.1 चा पीक टोर्क जनरेट करते. यामुळेच ही बाईक 11.25 सेकंदामध्ये शून्य ते 100 किलोमीटर चा टप्पा अतिशय सहजतेने गाठू शकते.

Hornet 2.0 मध्ये 5 स्पीड गियर बॉक्स बसविण्यात आलेला आहे तर या मोटारसायकल ची लांबी 2,047mm, रुंदी 783mm आणि उंची 1,06mm ठेवण्यात आलेली आहे तसेच या बाईक चा वीलबेस 1,355mm ठेवण्यात आलेला आहे.

नवीन Hornet 2.0 मिळणार ४ कलर ऑप्शनमध्ये

होंडाच्या या होर्नेट 2.0 ची फ्युएल टॅंक कॅपॅसिटी ही बारा लिटर ठेवण्यात आली आहे. या नवीन बाईकला चार कलर ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत त्यामध्ये मॅट संग्रिया रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस, मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि मॅट मारवल ब्ल्यू मेटॅलिक या चार कलर ऑप्शन मध्ये नवीन बाईक होंडाच्या माध्यमातून लॉन्च केली गेली आहे. आपल्या बाईकवर सहा वर्षांची वॉरंटी पाहिजे आहे तसेच तीन वर्षांची स्टॅंडर्ड प्लस ऑप्शनल वॉरंटी दिली आहे.

हे पण वाचा: Weather Update: राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाचा इशारा! दीर्घ प्रतिक्षेनंतर ‘या’ जिल्ह्यांत पावसाची हजेरी

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!