जूनी पेन्शन मिळण्यासाठी आज खेड मधून निघाली पदयात्रा

खेड (मंदार आपटे):
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी १४ मार्च -२०२३ पासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्रभर सर्व क्षेत्रातील कर्मचारी बेमुदत संपावर जात आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक संघटना तसेच सर्व सरकारी-निमसरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसह इतर प्रलंबित मागण्या मिळविण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. आज कर्मचारी व पदािकाऱ्यांनी पदयात्रा काढली.

ही यात्रा खेड पंचायत समिती पासून सुरू झाली खेड बाजारपेठ, तीनबत्ती नाका, तल्याचे वाकन, सिद्धिविनायक मंदिर वरून कन्या शाळा मार्गे पुन्हा पचायंत समिती मध्ये आली यावेळी तळ्याच्या वाकण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला अभिवादन करण्यात आले.काल बाईक रॅली काढण्यात आली आणि आज पद यात्रा काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते यावेळी घोषणा देत शहर परिसर दणाणून गेला होता.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!