चोरवणे गावची ग्रामदेवता श्रीरामवरदायिनी देवीच्या चांदीच्या नुतन रुपीचा १५ आणि १६ मार्च ला चरप्राणप्रतिष्ठा आणि नवग्रहयुक्त नवचंडी हवन सोहळा
खेड(मंदार आपटे): खेड तालुक्यातील चोरवणे गावातील जागृत देवस्थान ग्रामदैवत आदिशक्ती श्रीरामवरदायिनी,झोलाई,मानाई व वाघजाई.नुकतेच देवीचे काळ्या पाषाणातील हेमाडपंथीय मंदिर बांधलेले असून राज्यातून व राज्याबाहेरूनही असंख्य भाविक दर्शनास येत असतात.स्वप्नांना सत्याचा मार्ग दाखविणारी,हाकेला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून ख्यातनाम असलेल्या या देवीचे स्थान आज भाविकांचे श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आले आहे. किंबहुना महाराष्ट्र शासनाने “क” दर्जाचे …