ज्ञानदीप बालभवन, भडगावमध्ये गोपाळकाला निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न
मंदार आपटे-खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड रत्नागिरी संचालित ज्ञानदीप बालभवन भडगाव या प्रशालेमध्ये बालवाडीच्या विध्यार्थ्यासांठी गोपाळकाला निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रशालेतील नर्सरी, लहान गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी गोपाळकाला निमित्त आयोजित करण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या. …