खेड :
बऱ्याच वर्षा पासून दु. १.४५ वा.ची खेड बहिरवाली पन्हाळजे एस.टी बस चालु होती परंतू काही महिण्या पूर्वी सदर गाडी बंद करण्यात आली आहे. ह्या मार्गावर (दु.१२.०० व ३.३०) ह्या मधल्या वेळेत एस.टी नसल्याने खेड बहिरवाली पन्हाळजे मार्गावर प्रवाशांची गैरसोय होत आहेत व प्रवाशांना शालेय विद्याथ्यानां वडाप शिवाय पर्याय नसतो. हि एस.टी पुन्हा चालू होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेड एस.टि डेपो मॅनेजरना निवेदन देण्यात आल, ४ ते ५ दिवसात १.४५ वाजताची खेड बहिरवली पन्हाळजे एस.टी. चालू होईल असे आश्वासन एस.टि.डेपो मॅनेजरनी दिले.
या प्रसंगी निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पुष्पेंन दिवटे, तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहर अध्यक्ष सिद्धेश साळवी,खाडी पट्टा विभाग अध्यक्ष ओवैस चौगुले, आधी पदाधिकारी उपस्थित होते
हे देखील पहा :