कोण्या सेलिब्रेटी च लग्न म्हणजे संपूर्ण देशा मध्ये गॉसिप ची लाट आलेली असते, ती आलिया-रणबीर च लग्न असो विकी-कटरीना च लग्न किंवा आता होणार परिणीती चोप्रा- राघव चड्डा यांचे लग्न असो. हे लग्न कुठं होणार कसं होणार आमच्या लग्नाला कोण कोण हजर राहणार ही चर्चा सगळीकडे होताना दिसत असते.
23 आणि 24 सप्टेंबरला यांच्या सर्व लग्नाचे रीती रिवाज पार पडणार आहे उदयपूर मधील लीला पॅलेस मध्ये तेही पंजाबी पद्धतीने विधीवत लग्न होणार आहे.
सर्व प्रकारच्या रितीरिवादांना आज पासून सुरुवात झाली शुक्रवारी सकाळी हेच जरूर जोडपे उदयपूर मध्ये रवाना झाले होते. तर उदयपूर मध्ये परिणीती आणि राघव यांचे भव्य स्वागत झाले जय्यत तयारी मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले होते त्याचे बरेचसे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत.
त्यांच्या नावाचे एक मोठे पोस्टर उदयपूर मध्ये लावण्यात आलेले असून वेलकम टू उदयपूर परिणीती आणि राघव असे त्यावर लिहिलेले होते. याशिवाय लोक बँड आणि ढोल ताशा यांच्या समवेत कार्यक्रम स्थळी त्यांचे वाट पाहत होते संपूर्णतः पंजाबी शैली त्यांचे स्वागत झाले.
खरंतर यांच्या लग्नाच्या फंक्शनला सुरुवात दिल्लीच झाली होती सूफी नाईट चे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांच्या घरातील सर्व सदस्य सहभागी झालेले होते प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ चोप्रा यावेळी उपस्थित होते.
आता 24 सप्टेंबर म्हणजे उद्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचे उदयपूर मध्ये लग्न पार पडणार आहे. उद्या सेहराबंदीनंतर दुपारी लग्नाचा बेडा ते एकमेकांना घालतील. त्यानंतर सायंकाळी स्वागत समारंभाचे आयोजन केलेले आहे ज्यामध्ये बॉलीवूडमधील काही खास सेलिब्रिटी आपल्या कुटुंबांसह उपस्थित असतील. त्यानंतर चंदिगडमध्ये रिसेप्शनचे आयोजन राघव चड्डा आणि परिणीती चोप्राच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेले आहे.
प्रियंका चोप्रा लग्नाला येणार?
अशावेळी एका व्यक्तीची सर्वच जण वाट पाहत आहे ती म्हणजे परिणीतीची मिमी दी म्हणजेच प्रियंका चोप्रा कारण प्रियंका चोप्रा अजूनही भारतात आलेली नाही त्यासंबंधी प्रियंका ने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो टाकून पोस्ट केली आहे व तिच्या धाकट्या बहिणीला तिने लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यावरून असे कळते की तिला लग्नाला येता येणार नाही आणि ती सध्या अमेरिकेतच आहे.
प्रियंका चोप्रा हिने तिच्या इंस्टाग्राम च्या स्टोरीवर तिच्या बहिणीसाठी म्हणजेच परिणीतीसाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने परिणीतीचा सुंदर फोटो शेअर करून लिहिले होते की, “मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मोठ्या दिवशी तितकेच आनंदी आणि समाधानी असाल नेहमी खूप प्रेम.”
प्रियंका चोप्रा ने केलेल्या या पोस्ट नंतर ती तिच्या बहिणीच्या लग्नाला येऊ शकणार नाही अशी सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रानुसार प्रियंका चोप्रा तिच्या मुलगी सोबत म्हणजेच मालती सोबत लग्नाला येणार असल्याचं बोललं जात होतं. निक जोनास येणार नाही हे माहीत होतं, परंतु आता प्रियंका चोप्राच्या पी आर टीमने याबाबत माउंट बाळगले आहे व याबाबतची कोणतीही स्पष्टता अजून टीमने दिलेली नाही.
हे पण वाचा: परिणीती चोप्रा आणि नेते राघव चढ्ढा यांनी लग्नासाठी निवडला ‘रॉयल पॅलेस’; एकाच रात्रीचे भाडे तब्बल..