रमेश बिधुडींच्या बयकोप वादात! आक्षेपहार्य शब्दांचा धमाल, काँग्रेसने खासदार रद्द करण्याची मागणी केली!

बसपा खासदार दानिश अली यांना भाजपचे खासदार रमेश बिथुडी यांनी लोकसभा सभागृहात शिवीगाळ केली 21 सप्टेंबरला खासदार रमेश बिधुडी यांनी आक्षेपहार्य शब्द दानिश अली यांच्या विरोधात वापरले यानंतर काँग्रेस सह इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी रमेश बिथुडी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

रमेश बी थोडी यांनी दानिश अली यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य केल्यानंतर लोकसभा सभागृहांमध्ये गदारोळ उडाला होता. लगेचच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्याला जोर धरला. या सर्व गदारोळ्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष खासदार ओम बिर्ला यांनी भाजपा खासदार रमेश बिधुडी यांच्या वादग्रस्त विधानाची विशेष दखल घेतली आहे आणि भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा केल्यास त्यांच्या वर कठोर कारवाई होईल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे।

बिधुडी यांनी वक्तव्य केल्यानंतर पूर्ण सभागृहात गदाराळू माजला होता उपस्थित असलेले भारत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तत्परतेने या बिधुडी यांच्या वक्तव्याचा खेद व्यक्त केला बहुजन बहुजन समाज पक्षाचे खासदार असलेले दानिश अली यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली, तेव्हा ते असे म्हणाले की “मला आशा आहे की, मला योग्य तो न्याय मिळेल. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सदर खासदारावर कठोर व कारवाई करतील, आणि असं झालं नाही तर मी सभागृह सोडण्याचा विचार करेल.”

दरम्यान काही वृत्तसंस्थांनी त्यांच्या वृत्तांमधून असे म्हटले आहे की भाजप खासदार यांनी जे वक्तव्य केलं आहे, ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार केले आहे. त्यामुळे दानिश अली यांच्या विरोधात असंसधीय भाषेचा वापर केल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

बिधुडी आणि वाद

बिधुडी आणि वाद हे भारतीय राजकारणासाठी असे नवीन समीकरण नाही. कारण 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर हल्ला करण्यासाठी सोनिया गांधींना इटालियन असण्याचा मुद्दा पुढे केला होता. मथुरेमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत ते असे म्हणाले होते की, “इटलीमध्ये लग्न झाल्यानंतर पाच ते सात महिन्यांमध्ये नातवंड जन्माला येत असतील हे जे दाखवत आहेत ते तिथलेच संस्कार आहेत पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे संस्कार नसतात हे संपूर्ण देशाला माहित आहे.”

परंतु काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या या आक्षेपहार्य विधानावर स्पष्टीकरण दिले आणि ते म्हणाले की आमचा पाच वर्षाचा काळ पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही अच्छे दिन चा हिशोब मागता येणार नाही.

सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे झाली तरी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जी काही आश्वासन दिली होती, ती पूर्ण केली नसल्याच्या काँग्रेसने ज्या टीका केल्या होत्या त्या ठिकाणांना उत्तर देताना बिधुडी यांनी हे वक्तव्य भर सभेमध्ये केले होते.

हे पण वाचा: परिणीती चोप्रा आणि नेते राघव चढ्ढा यांनी लग्नासाठी निवडला ‘रॉयल पॅलेस’; एकाच रात्रीचे भाडे तब्बल..

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!