सलोखा योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हयात खेड तालुका पहिले प्रकरण निर्णीत महसूल विभगातर्फे विशेष प्रयत्न घेण्यात आले

मंदार आपटे :- खेड तालुक्यात सलोखा योजना गाव गावात पोचली पाहिजे यासाठी तहसील प्रशासन अतोनात मेहनत घेत आहे . नुकतीच 31मार्च अखेर खेड मधील रजवेल या गावी ही योजनेचा लाभ तेथील शेतकरी यांना मिळाला. या योजने अंतर्गत मडल अधिकारी संजय मंद्रे व उमेश भोसले यांनी तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांचे मार्गदर्शन घेत ही योजना शेतकरी यांना मिळून दिली आणि जिल्हा मध्ये खेड मध्ये त्याचा लाभ झाला.

मुख्य़मंत्री व महसूल मंत्री महोदय यांचे संकल्प़नेतून “ सलोखा योजनेबाबत ” महाराष्ट़ शासन, महसूल व वनविभागाकडील शासन निर्णय क्रमांक.मुद्रांक-2022/प्र.क्र.93/म.1 (धोरण), दिनांक 03 जानेवारी, 2023 मधील तरतूदीनुसार एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्यांकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा नांवावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क़ नाममात्र रु.1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे.

दिनांक 22 व 23 फेब्रवारी 2023 रोजी लोणी, जि.अहमदनगर येथे झालेल्या महसूल परिषदेनंतर ना. उदय सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांनी रत्नागिरी जिल्हयाची आढावा बैठक घेवून रत्नागिरी जिल्हयामध्ये सलोखा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना संबोधित केले होते.

याच आदेशाचे पालन करत जिल्हा मध्ये खेड तालुक्यातील मौजे राजवेल, येथील शेतकरी यांनी या योजनेचा लाभ घेतला यासाठी विशेष प्रयत्न करणारे खेडचे महसूल चे सर्व अधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत यावेळी विशेष परिश्रम खेड प्रांत मॅडम राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, निवासी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत सिनकर, मंडल अधिकारी संजय मंद्रे, तलाठी उमेश भोसले ,भिकू जाधव, आदी पदाधकारी उपस्थित होते .

हे देखील पहा👇👇 :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!