खेड – येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस.महाविद्यालय खेड आणि एस.एम.शेट्टी पवई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट्स एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण केली.
आय.सी.एस.महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रविज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी पवई येथील एस.एम.शेट्टी महाविद्यालयाला 4 मार्च ते 7 मार्च या काळात भेट दिली आणि तेथील शहरी जीवन, संस्कृती यांचा अनुभव घेतला. यानंतर एस.एम.शेट्टी पवईच्या 30 विद्यार्थ्यांनी 18 मार्च 2024रोजी कोकणात येऊन आय.सी.एस. महाविद्यालयास भेट देऊन तशाच प्रकारचा अनुभव घेतला. हा कार्यक्रम एकूण 4 दिवस म्हणजे 18 मार्च ते 21 मार्च 2024 असा आयोजित करण्यात आला होता.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे चेअरमन श्री.अमोलभाई बुटाला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री.मितेशभाई बुटाला, श्री.संकेतभाई बुटाला, श्री.उत्तमकुमार जैन, श्री.शेखरभाई तलाठी, हिराचंद पर्शराम बुटाला माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन शास्त्रचे संचालक श्री.सुरेश खेडेकर, प्राचार्या प्रो.डॉ.अनीता आवटी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रो.डॉ.अयुब शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ.सचिन भोसले यांनी विभागात होणार्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्या प्रो.डॉ.अनीता आवटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कु.अनम कौचाली व कु.मयूरेश शेवाळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एस.एम.शेट्टी पवईच्या प्रा.शीतल कानोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्व विभागांना भेट देऊन माहिती घेतली. डॉ.एस.के.घुंबरे यांनी ‘रोल ऑफ आय.टी. इन केमिस्ट्री’ व प्रा.अमोल पाटील यांनी ‘फिजिक्स इलेक्ट्रोनिक टेक्नोलोजी’, या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर लगोरी, बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम यासारख्या खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
त्यानंतर दुसर्यादिवशी दापोली आणि हर्णे येथे ऐतिहासिक आणि भोगोलिक क्षेत्र सहल आयोजित करण्यात आली होती. तिसर्या दिवशी प्रा.आलिया तांबे, प्रा.नेहा पेटकर, प्रा.रिद्धी पवार, प्रा.शैलेश सुतार, प्रा.पूनम देवळेकर, डॉ.सी.आर.साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात प्राध्यापकांमध्ये विविध विषयांवर चर्चासत्र झाले.
सांगता समारंभास सौ.साधनाताई बुटाला, सौ.अलकाताई बुटाला, श्री.मितेशभाई बुटाला, श्री.उत्तमकुमार जैन, श्री.सुरेश खेडेकर, श्री.हनुमंत गरुड, डॉ.प्रसाद भणगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते, येथील विद्यार्थ्यांनी कोकणच्या सर्व लोककलांचे बहारदार सादरीकरण केले. संपूर्ण कार्यक्रमांदरम्यान डॉ.विजया भोसले व आलिया तांबे आमोल काबळे यानी सूत्रसंचालन केले, तर प्रा.अक्षता चव्हाण व हर्षदा नागे यांनी आभार प्रदर्शन केले.
हे देखील पहा: शाळेकडे जाणार रस्ता सुधारा नाहीतर २६ जानेवारी रोजी साखळी उपोषण बसणार पालकाचे निवेदन