खेड (मंदार आपटे) :
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे आज शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी चिपळूण व खेड तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम यांनी दिली आहे. चिपळूण तालुका विकासकामांची आढावा बैठक सकाळी ११ वाजता सावर्डे येथील जिल्हा कार्यालयात होणार आहे.
त्यानंतर खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगभवन येथे दुपारी ३ वाजता आढावा बैठक झाल्यानंतर खेड तहसील कार्यालयात सायंकाळी ५ वाजता खेड तालुका विकासकामांची आढावा बैठक होणार आहे. तरी चिपळूण व खेड तालुका विकासकामांच्या या आढावा बैठकांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी प्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खेड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष स. तु. कदम यांनी केले आहे.
हे देखील पहा :