आय.सी.एस. महाविद्यालयात चैतन्य वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
(मंदार आपटे): खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक मा.श्री.ना.बा.शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.मंगेशभाई बुटाला, संचालक मा.श्री.अमोलभाई बुटाला, सौ.सजेलीताई बुटाला, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एच.पी.थोरात, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर …