किल्ले रसाळगड चे रुपडे पालटणार
मंदार आपटे खेड:खेड तालुक्यातील किल्ले रसाळगडसाठी १४ कोटी ९१ लाख ४१ हजार ९४० रुपये अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.त्यामुळे या गढाचा लवकरच कायापालट होणार आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर शिव छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारा हा गड कोकणच्या नकाश्यावर अग्रेसर …